Mahatma Gandhi National Rural Employment Guarantee Scheme | राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अर्थात मनरेगा ज्या मनरेगा योजनेच्या अंतर्गत केंद्र शासनाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील नागरिकांना शेतकऱ्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणं रोजगारातून कायमस्वरूपी मत्ता निर्माण करून देणं उत्पन्नाची साधन मिळवून देणं पायाभूत सुविधांची निर्मिती करणं अशा विविध बाबी विविध योजना राबवल्या जातात मात्र मित्रांनो या योजनांच्या अंतर्गत ज्या बाबींचा लाभ शेतकऱ्यांच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे.

 अशा शेतकऱ्यांना सामान्य नागरिकांना गेल्यासहा महिन्यापासून वर्षापासून कुशल अकुशलची बिलं दिली गेलेली नाहीत आणि अशा प्रकारची या योजनेची चित्रकथा असतानाच या योजनेची तारांबळ असतानाच राज्यशासनाच्या माध्यमातून आज 17 जून 2025 रोजी एक अतिशय गजब असा शासन निर्णय निर्गमित केलेला आहे ज्याच्यामुळे या योजनेची राज्यामध्ये जाहिरात प्रसिद्धी करण्याकरता 10 कोटी 60 लाख रुपयाचा निधी वापरला जाणार आहे.

 मित्रांनो केंद्र शासनाच्या माध्यमातून राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत 266 कामांचा समावेश करून याचा ग्रामीण भागातील नागरिकांना शेतकऱ्यांना लाभ दिला जातो आणि याच राबवल्या जाणाऱ्या योजनांची राज्यामध्ये 2025-26 करता आषाड वारीच्या कार्यक्रमामध्ये अर्थात 19 जून 2025 ते 6 जुलै 2025 या 18 दिवसाच्या कालावधीमध्ये जाहिरात प्रसाद प्रसिद्धी करण्यासाठी आता जवळजवळ 10 कोटी 60 लाख रुपयाचा निधी खर्च करून याची जाहिरात केली जाणार आहे.

मित्रांनो याच्यामध्ये जे काही LED व्हान असतील या LED व्हान च्या  माध्यमातून जाहिरात करणं कियोस्को द्वारे प्रसिद्धी करणं त्याचप्रमाणे रोडशो पटनाद्वारे प्रसिद्धी करणं अशा विविध माध्यमातून विविध बाबीमधून 10 कोटी 32 लाख 50 हजार रुपयाचा निधी हा खर्च केला जाणार आहे.

तर याच्यासाठी लागणार मनुष्यबळ वाहतूक खर्च किरकोळ खर्च असा जे काही कार्यालयीन खर्च आहे याच्यासाठी तब्बल 27 लाख प हजार रुपयाचा असा एकूण 10 कोटी 60 लाख रुपयाचा GST सह हा निधी या योजनांच्या प्रचार प्रसिद्धीसाठी वापरला जाणार आहे.

 मित्रांनो एकंदरीत आपण जर पाहिलं तर नवीन विहिरी असतील, फळबागा असतील, गायगोटे असतील किंवा याच्या अंतर्गत राबवल्या जाणाऱ्या बांधबंदिस्ताच्या योजना असतील अशा विविध योजनांचा लाभ ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी नागरिकांसाठी अतिशय महत्त्वाचा असा असतो आणि साहजिकच याची प्रचार प्रसिद्धी झाल्यात याचा फायदा हा शेतकऱ्यांना होऊ शकतो.

परंतु मित्रांनो गेल्या एक वर्षापासून याच्या अंतर्गत ज्या योजनांचा ज्या बाबींचा लाभ शेतकरी ग्रामीण भागातील नागरिक घेत आहेत अशा लाभ घेणाऱ्या नागरिकांना मात्र त्यांच्या कुशल अकुशलचे बिल दिली जात नाहीत ती थकवली गेलेली आहेत आणि साहजिकच याच्यामुळे शेतकऱ्यांमध्ये सर्वसामान्यांमध्ये या योजनेविषयी किंवा या योजनेच्या अंमलबजावणी विषयी मोठ्या प्रमाणात रोष आहे आणि असा रोष असतानाच या शेतकऱ्यांच्या या आषाढवारीमध्ये या सर्वसामान्यांच्या समोर या योजनेचे च अंमलबजावणीची जी काही प्रचार प्रसिद्धी आहे ती केली जाणार आहे आणि याच्यासाठी सुद्धा तब्बल 10 कोटी 60 लाख रुपयाच्या निधीचा चुराडा केला जाणार आहे.

अतिशय गजब आणि न समजण्यासारखा न काढला जावा असा जीआर आता शासनाच्या माध्यमातून काढलेला आहे. साहजिकच योजनेबद्दल असलेला रोष आणि त्याच्यामध्ये एखाद्या जखमेवरती मीठ चोळणं अशा प्रकारची परिस्थिती आता या जाहिरातीच्या माध्यमातून केली जाणार आहे. शासनाच्या माध्यमातून प्रथमतः ज्या बाबींचा लाभ दिला जातो त्या बाबींची वेतन मानधन अनुदान जे असतील ती त्या लाभार्थ्यांना देणं गरजेचे आहे आणि असं न करता या जाहिरात प्रचार प्रसिद्धीवरती पैशाचा हा जो चुराडा केला जातोय.

अजून पाहण्या साथी इथे क्लिक कर  sarkariyojana.store

Leave a Comment